केन्द्र सरकारने मोबाईलच्या IMEI नियमात नवीन बदल केलाप्रेस मीडिया लाईव्ह :

केन्द्र सरकारने मोबाईलच्या IMEI नियमात नवीन बदल केला आहे. या नियमाच्या मदतीने मोबाईलबाबत होणारा काळाबाजार, बोगस IMEI क्रमांकाचा वापर, या क्रमांकाची अदलाबदल, मोबाईलची चोरी होणे यासारख्या घटनांना आता लवकरच आळा बसायला मदत होईल. 

दूरसंचार विभागाच्या (DOT) अधिसूचनेतील एका नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, सर्व स्मार्टफोनचे आयएमईआय क्रमांक नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे.

यामुळे फोनमधील IMEI नंबरच्या मदतीने चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोपे होईल तसेच मोबाईल लवकर सापडण्यासाठीही याची मदत होईल. हा नवीन नियम 1 जानेवारी 2023 पासून देशभरात लागू होणार आहे. यामुळे हिंदुस्थानात विक्री होणाऱ्या मोबाईलच्या चाचणी आणि संशोधनासाठी https://icdr.ceir.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

IMEI क्रमांक म्हणजे ?

कोणत्याही स्मार्टफोनची ओळख म्हणजे त्याचा IMEI क्रमांक. बनावट मोबाईल आणि मोबाईल चोरी होण्याच्या घटनांमध्ये IMEI क्रमांक महत्त्वाचा ठरतो. फोन चोरीला गेल्यास, सिम कार्ड बदलले जाते. अशावेळी चोरीला गेलेल्या फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून चोरीला गेलेला मोबाईल ओळखता येतो. 2020 साली मोबाईल चोरीची काही प्रकरणे उघडकीस आली होती. यामध्ये समान IMEI क्रमांक असलेले 13,000 मोबाईल सापडले होते. यामुळेच मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी सरकारने आयएमईआय बाबतच्या नियमात बदल होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post