उपकेंद्र तक्रारवाडी येथे 53 उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची तपासणी



प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी

हृदयाच्या आजारामुळे वाढणारा मृत्यू दर कमी करण्यासाठी जागतिक हृदय दिवस साजरा केला जातो

हृदय रोगाची कारणे -तंबाखू सेवन लठ्ठपणा मध्यपान करणे धमनी रोग अनुवंशिकता उच्च रक्तदाब असंतुलित आहार मधुमेह शरीर निष्क्रियताअसंसर्गजन्य रोगाची लक्षणे प्राथमिक स्तरावर ती दिसत नाही बचावासाठी तीस वर्षावरील नियमित ब्लड प्रेशर मधुमेह इत्यादींसारख्या तपासणी व औषध उपचार आपल्या तक्रारवाडी उपकेंद्र मध्ये मोफत आहेत  नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा

छाती दुखणे , हृदयात धडधड होणे किंवा चक्कर येणे, घाम येणे  , पायऱ्या चढताना धाप लागणे किंवा लगेच बेशुद्ध होणे,खांदा किंवा हातामध्ये दुखणे ,काम केल्यानंतर ना श्वास घेण्यास त्रास होणेया पैकी कोणतेही लक्षण आढळून आल्यास आपल्या जवळच्या उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी संपर्क साधावे 

"सकस आहार योग्य व्यायाम देईल सुदृढ हृदयाची साथ"हृदय सुदृढ ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी मिठाचे प्रमाण संतुलित ठेवावे ,धूम्रपान टाळावे ,ताणतणावांना बळी पडू नये नियमित व्यायाम करावा, ताजी फळे भाजीपाला खावेत, पुरेशी झोप घ्यावी

समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप, आरोग्य सेविका -प्रिया भोसले , आशा-शोभा काळंगे ज्योती जगताप भारती बंडगर, सीमा मार्कड, सविता देवकाते मनीषा देवकाते

Post a Comment

Previous Post Next Post