एका विवाहीत महिलेने पतीच्या व सासरच्या हुंडाबळीच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली


प्रेस मीडिया लाईव्ह :

जब्बार मुलाणी

  आपल्या समाजात जात, धर्म यांनुसार खूप वेगवेगळ्या रूढी-परंपरा आहेत. त्यानुसार हुंडा घेण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा जरी औद्योगीकीकरणामध्ये आणि शिक्षण क्षेत्रात विकास झाला किंवा होत असला असं म्हटलं जरी जात असलं तरी समाज अजूनही बुरसटलेल्या रूढी-परंपरा मध्ये अडकलेला आहे. अजूनही हुंड्यामुळे अनेक मुली / स्त्रिया याचे बळी जात आहेत. आपल्या समाजात पूर्वीपासूनच मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून मुलीच्या आई-वडिलांना मुलाला व त्याच्या घरातील व्यक्तींना हुंडा देण्याची परंपरा आहे.


त्यात आता तर हुंडा घेण्याचीही वेगवेगळी कारणं दिली जातात. मुलगा खूप शिकलेला असेल, चांगली नोकरी करत असेल आणि त्यातल्या त्यात सरकारी नोकरी करत असेल तर आणखी मोठ्या रकमेचे हुंडे घेतले जातात, मुलींचं लग्नासाठीचं वय तीसच्या पुढे गेल असेल तर जास्त हुंडा द्यायचं, मुलींच्या दिसण्यावरून, मुलींना काही अपंगत्व असेल त्यानुसार हुंड्याची मागणी केली जाते. तसेच मुलगा एन आर. आय असेल तर खूप मोठ्या प्रमाणात हुंडा मागितला जातो. आता हुंडा फक्त पैशाच्या स्वरूपात राहिला नाही तर त्याच्या बदल्यात सोनं, फ्लॅट, गाडी, लग्न करण्याच्या पद्धती म्हणजे चांगले हॉल, खान-पान, सजावटी, कपडालत्ता यावर खर्च जास्त होतो या सगळ्या सोयी-सुविधा पुरविण्याची मागणी मुलींच्या घरातल्याकडून केली जाते. यासाठी बऱ्याच मुलींचे आई-वडील मुलीच चागलं होतंय म्हणून कर्ज काढून लग्न करतात.

तसेच हल्ली मुलगी शिकलेली, नोकरी करणारी असावी अशी अपेक्षा असते. कारण घरात आर्थिक हातभार लागेल. पण त्या मुलीला नोकरी, घर, मुल असं सगळंच सांभाळण्याची जबाबदारी मात्र तिच्यावरच दिली जाते म्हणजे आर्थिक हातभारही तिने लावायचा आणि घरातील कामाची, माणसांची, मुलं सांभाळायची जबाबदारीही तिचीच असते. त्यामध्ये घरातील पुरुष हातभार नाही लावत आणि तिने कमविलेले सगळेच पैसे घरात वापरले जातात, त्यावरही तिचा अधिकार नाही अशा पद्धतीने मुलीच्या शिक्षण आणि नोकरी करण्याचा गैरफायदा घेतला जातो. आणि समाजातील बऱ्याच लोकांना असं वाटतं, 'शिकलेली, नोकरी करणारी मुलगी म्हणजे कायम मिळत राहणारा हुंडाच.'

पण आपल्या समाजातील पालक हा विचार करत नाही की आपल्या मुलगीला नक्की काय हवं आहे, ज्यामुळे ती पुढील आयुष्य आनंदाने जगू शकेल, तिच्या मतांचा विचारच बऱ्याच वेळा केला जात नाही. हुंडा मागण्याची प्रक्रिया ही लग्न होईपर्यंतच नसते तर तर झाल्यावरही चालूच राहते.

म्हणूनच अशा चुकीच्या रूढी-परंपरा आपण मोडीत काढल्या पाहिजेत, त्यासाठी ठामपणे विरोध केला पाहिजे. हुंडा घेणं आणि देणं दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे आणि असंकरणाऱ्याला कायद्याच्या चौकटीत शिक्षाही होते. असीच घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. यातील फिर्यादीची मयत मुलगी नामे रुपाली संजय गोयकर वय 20 वर्षे, रा गलांडवाडी ता कर्जत जि अहमदनगर हिचे यातील आरोपी नं 1 सोबत सुमारे एक वर्षापुर्वी लग्न झालेले असताना त्या नंतर सुमारे सहा महिन्यापासुन तिचे माहेरुन दोन लाख रुपये | पिकअप घेण्यासाठी घेवुन ये असे म्हणुन वेळोवेळी मानसिक व शारिरीक त्रास देवुन मारहान करुन ती गरोदर असताना तिला दवाखान्यात न बघीतल्याने तिस माहेरी आणले असता आरोपी पती फोन करुन वेळोवेळी मानसिक त्रास देवुन महिलेस  गळफास घेण्यासाठी भाग पाडले. आरोपींची नावे

1. अलका गोयकर 2. संजय बाळु गोयकर 3. बाळु जगनाथ गोयकर रा.गडवडी ता.कर्जत जि. अहमदनगर

यांच्या वर ता.कर्जत पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post