गुजरातमध्ये भरधाव कारने पादचाऱ्यांना 12 जणांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जखमी झालेत.



प्रेस मीडिया लाईव्ह :

अहमदाबाद : गुजरातमध्ये भरधाव कारने पादचाऱ्यांना  12 जणांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जखमी झालेत. ही घटना अरवलीमध्ये आज सकाळी घडली. जखमींना उपचारासाठी मालपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील या मोठ्या दुर्घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. येथे एका भरधाव कारने पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. यावेळी काही पादचाऱ्यांना कारने चिरडले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. अरवली मालपूरमधील कृष्णपूरजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  



Post a Comment

Previous Post Next Post