लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने 102 विद्यार्थी शिक्षणासाठी घेणार दत्तक_____राज्य प्रवक्ता संतोष पाटील

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली : गेल्या दोन-तीन वर्षापासून  सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्या व विद्यार्थिनीचे दोन्ही पालक कोविड च्या उपचार घेत असताना किंवा  कोविड मुळे आईवडील दोघांचाही मृत्यू झाला असेल तर त्यांची मुले पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतली जातील अशी माहिती सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आज साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षणासाठी दत्तक योजना चालू केले आहे तरी सांगली शहरातील किंवा जिल्ह्यातील ज्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे कोरोनामुळे दोन्ही ही पालक मृत्यू झालेल्या त्या कुटुंबातील व्यक्तीने किंवा त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने दक्षिण शिवाजीनगर, चांदणी चौक, सांगली येथे संपर्क साधावा अशी आव्हान राज्य प्रवक्ता संतोष पाटील यांनी केले आहे. 

या वेळी ज्येष्ठ नेते प्रकाश (अण्णा) चौगुले, सुनील(भाऊ) पिराळे, राजाभाऊ रामचेद्रे, सुधाकर नार्वेकर, राजू पेंढुरकर ,गोटखिंडी दादा, चंद्रकांत मालवणकर, गणपतराव कुरणेकर, गजानन पोतदार, पाटील मामा, सतीश निंबाळकर ,रवी काळेबेरे ,संजय काळेबेरे ,विशाल नार्वेकर, राजू कासार, संजय फल्ले सुनील रामचंद्र_ गवळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post