आमदार प्रशांतजी ठाकुर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बूस्टर डोस लसीकरण सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात संपन्नप्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा  : सुनील पाटील

 आज आमदार प्रशांतजी  ठाकुर  साहेब यांच्या वाढदिवसाचे  औचित्य  साधुन  भारतीय जनता  पार्टी कर्जत  आणि  उपजिल्हा रुग्णालय  कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने बुस्टर डोस  लसीकरण शिबीर सुनील गोगटे  यांचे  जनसेवा  कार्यालयात आयोजित  करण्यात आले  होत. यात 153 लोकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन डोस  देण्यात आले.  सर्व नागरिकांना सहजतेने  लस  उपलब्ध व्हावी या उद्देश ह्या शिबिराचे  आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी उपक्रमाचे  कौतुक  करून  भाजप आणि  प्रशांतजी ठाकुर  यांना शुभेच्छा दिल्या. लसीकरण उपजिल्हा रुग्णालयांच्या डॉक्टर संगीता  दळवी  आणि त्यांचे दोन सहकारी यांनी पार पाडले.

याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष वसंतराव भोईर, उपनगराध्य अशोक ओसवाल, सुनील गोगटे, दिनेश  सोळंकी  विजय कुलकर्णी, मारुती जगताप , मिलिंद खंडागळे, समीर  घरलुटे, ,राहुल मसणे ,प्रशांत उगले, शिरीष  कदम, दिनेश  गणिगा, रावसर,अभिजित  पटेल ,अभिषेक तिवारी  सर्वेश  गोगटे,आदित वांजळे,रवींद्र जाधव , दर्पण घारे,विश्वनाथ लोखंडे, गायत्री परांजपे,  स्नेहा गोगटे, शर्वरी  कांबळे, प्रीती तिवारी, सोनिया गरवारे,पुनम  डेरवणकर  अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post