दिलखुलास’ कार्यक्रमात पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची मुलाखत

 


 प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर  मंगळवार दि. २३ ऑगस्ट, बुधवार दि. २४ ऑगस्ट व गुरूवार दि. २५ ऑगस्ट २०२२  रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासात्मक योजना, जिल्हा परिषद कामांचे कॅलेंडर ही संकल्पना, अमृत सरोवर अभियान, 'माझा झेडपी माझा अधिकार' ही अभिप्राय प्रणाली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, 'हर घर जल' या अभियानाची सुरू असलेली अंमलबजावणी आदी विविध विषयांची माहिती, श्री. प्रसाद यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

                  

Post a Comment

Previous Post Next Post