पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळणार की नाही..? याकडे सर्वांचं लक्षप्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई  : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळणार की नाही..? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान न्यायलयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. दरम्यान, संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत ईडीच्या अटकेत आहेत. 31 जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास 10 तास ईडीकडून चौकशी झाली.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने आज पुन्हा एकदा कोठडी 10 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली होती. परंतु संजय राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. परंतु कोर्टाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली.

Post a Comment

Previous Post Next Post