अध्यात्मिक शिक्षण संस्था गुरुकुल महड अश्टविनायक येथे ह भ प कुमार अक्षय चव्हाण याने शेवटच्या वर्षांमध्ये एम ए मराठी A+प्लस ही डिग्री घेऊन प्रथम क्रमांक आलाप्रेस मीडिया लाईव्ह

 खालापूर प्रतिनिधी :  दिनेश महाडिक

  ह भ प गुरुवर्य रामदास तथा भाई महाराज पाटील .यांचे मार्गदर्शनाने गेली सात वर्षापासून गरीब, गरजू, निराधार, अनाथ अशा परिस्थितीतून मुले शालेय शिक्षण व आध्यात्मिक शिक्षण घेत असतात. तीन मुलांपासून सुरू झालेली ही संस्था आता सध्या 32 विद्यार्थी संपूर्णपणे मोफत शिक्षण घेत आहेत यामध्ये जशी अध्यात्म मध्ये मुलांनी प्रगती केली त्याचबरोबर विद्यार्थ्याने आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये फार प्रगती केलेली दिसून येतेआणि याच संपूर्ण श्रेय ह.भ.प गुरुवर्य भाई महाराज पाटील यांनाच द्यावे लागेल. या गुरुकुलच्या प्रवासामध्ये  एम ए मराठीच्या शेवटच्या वर्गामध्ये शिकत असणारा कु. अक्षय चव्हाण याने शेवटच्या वर्षांमध्ये एम ए मराठी A+प्लस. ही डिग्री घेऊन प्रथम क्रमांक आला.

 गुरुकुलच्या मानामध्ये पुन्हा एक यश संपादन करून मानाचा तुरा रोवला आहे . असं मोलाचं कार्य या गुरुकुल मार्फत चालू आहे . कु. अक्षय चव्हाण व आध्यात्मिक शिक्षण संस्था (गुरुकुल) महड अष्टविनायक या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post