इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते राजाराम स्टेडियम येथे साजरा करणेत येणारप्रेस मीडिया लाईव्ह :

   इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  भारतीय  स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते राजाराम स्टेडियम  येथे साजरा करणेत येणार

   भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केंद्र आणि राज्य सरकारच्या  निर्देशानुसार इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करणेत येत आहेत. 

    या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सोमवार दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ .४५  वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त  होणारा नगरपरिषदेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रभारी अधिकारी तथा प्रशासक   मा.सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते   राजाराम स्टेडियमवर  मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करणेत येणार आहे. 

   अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यावर्षी महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळा तसेच शहरातील माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांच्या सहकार्याने राजाराम स्टेडियमवर  विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 

          तरी  सोमवार दि.१५ ऑगस्ट रोजी  ध्वजारोहण समारंभा साठी  नियोजित वेळेवर शहरवासियांनी राजाराम स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांचेकडून करणेत येत आहे.


   

   

Post a Comment

Previous Post Next Post