क्रांती उद्योग समूहाच्या वतीने प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कारप्रेस मीडिया लाईव्ह :

पलूस ता. ३१, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस व 'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांचा क्रांती उद्योग समूह आणि क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड जन्मशताब्दी समितीच्या वतीने क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या ( कुंडल ) कार्यस्थळावर क्रांती समूहाचे प्रमुख आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रसाद कुलकर्णी यांना वैचारिक क्षेत्रातील प्रतिष्ठित असलेला 'भाई माधवराव बागल पुरस्कार ' मिळाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ.प्रकाश कुंभार यांचा मॉरिशस येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.भाई व्ही.वाय.(आबा) पाटील यांनी सत्कारमूर्तींचे कार्यकर्तृत्व विषद करणारे मनोगत यावेळी व्यक्त केले.आमदार अरुणअण्णा लाड यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी क्रांती दूध संघाचे चेअरमन किरणदादा लाड,डॉ.बाबुराव गुरव,ऍड.सुभाष पाटील,कॉ.धनाजी गुरव,उमेश देशमुख,मारुती शीरतोडे,प्रा.गौतमीपुत्र कांबळे, डॉ.रणधीर शिंदे, ऍड.के.डी.शिंदे प्रासदाशिव मगदूम,राजाराम माळी,, प्रा.राजा माळगी,भाई संपतराव पवार,अरुण माने, अशोकराव पवार,प्रा.गौतम काटकर,मुन्नान शेख,प्रा.विश्वनाथ गायकवाड, प्रा.रोकडे,आय.एच.पठाण , विक्रम देशमुख, अविनाश लाड यांच्यासह विविध चळवळीतील  अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post