साखर कारखान्यांच्या मळीमिश्रित घातक रसायनांमुळे कृष्णा नदीत लाखो मासे मृत होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

स्वतंत्र भारत पक्षा'चे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे


प्रेस मीडिया लाईव्ह :

 सांगली - साखर कारखान्यांच्या मळीमिश्रित घातक रसायनांमुळे कृष्णा नदीत लाखो मासे मृत होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याला प्रशासकीय यंत्रणेची अनास्थाच कारणीभूत आहे.याकडे सातत्याने डोळेझाक करणार्‍या यंत्रणांच्या विरोधात 'स्वतंत्र भारत पक्षा'चे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात राज्यशासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदलाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

हरित लवादाकडे प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे की,

१. या वर्षी जुलैमध्ये कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागताच नदीत लाखो मासे मृत्यूमुखी पडले. यावर प्रदूषण मंडळाने नदीतील पाण्याचे नमुने घेतले; पण मासे नेमके कशाने मेले, पाण्यात काय मिसळले होते याचा अहवाल आला नाही. तोवर मौजे डिग्रजजवळ कृष्णा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले. मौजे डिग्रज ते अंकलीपर्यंतच्या कृष्णा नदीपात्रात दुतर्फा हीच स्थिती होती.

२. प्रत्येक वर्षी महापुराच्या पाण्यात घातक रसायनयुक्त पाणी सोडले जाते, असा नदी काठच्या नागरिकांचा आरोप आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सोयीस्कररित्या डोळेझाक करतात, तसेच दूषित पाणी कृष्णा नदीत सोडणार्‍या एकाही साखर कारखान्यावर आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केलेली नाही.

३. सांगली जिल्ह्याच्या हद्दीत अनेक कारखाने येतात; मात्र यातील कोणत्याही साखर कारखान्याला नोटीस बजावलेली नाही. अधिकार्‍यांनी ठिकठिकाणी पाण्याचे नमुने घेतले आहेत. गाळमिश्रित पाण्यामुळेच शेरीनाल्यातील मासे मृत्यूमुखी पडले, असा पवित्रा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगलीतील कार्यालयाने घेतला आहे.

४. वास्तविक कारखान्याचे पाणी नदीत सोडण्याचा प्रकार अनेक कारखाने करत आहेत, तरी या सर्वांना प्रदूषण मंडळाने तंबी देण्याची आवश्यकता आहे

Post a Comment

Previous Post Next Post