उद्या काय काय ओढतील याचा भरोसा नाही. अजित पवार



प्रेस मीडिया :

आता या नव्या सरकारच्या लांबलेल्या कॅबिनेटच्या शपथविधी  वरून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माईक ओढा ओढीवरून सर्वत्र टिका होऊ लागली आहे.  मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद चालू होती. बाजूला फडणवीसही बसले होते. पत्रकारांनी एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला सुरू केले तेवढ्यात देवेंद्र फडणवीसंनी थेट त्यांच्या समोरचा माईकच काढून घेतला आणि त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकलं आणि माइक पुन्हा त्यांच्या समोर ठेवला. 


 मुख्यमंत्री बोलत असताना असा अचानक माइक काढून घेणे हे  योग्य आहे..? या वरून आता विरोधक जोरदार  टीका करू लागले. आहेत , तसेच पत्रकार परिषदेत येणाऱ्या चिठ्ठ्या असु द्या, किंवा एकनाथ शिंदे यांचे बोलायला उभा राहताना फडणवीस यांना विचारणं असू द्या या सर्व घटना आता चर्चेत येऊ लागले आहेत.याच माइक ओढा ओढी वरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली, हे घटकेचं राज्य सहा महिने टिकलं तर नशीब असे म्हणत आज माइक ओढत आहेत, उद्या पॅन्ट ओढून नागडं करतील यांना, आज जे बंडखोर आहेत यांना या पुढे राजकीय आयुष्य नाही अशी घणाघाती टीका केली. एकनाथ शिंदे आणि आमदारांचं बंड झाल्यापासून एकीकडून संजय राऊत आणि दुसरीकडून विनायक राऊत असे दोन राऊत बंडखोरांवर सतत हल्लाबोल चढवत आहेत.

फक्त विनायक राऊतच नाही तर याच माइक ओढा ओढी वरून आज अजित पवारांनी पुन्हा शिंदे फडणवीस यांना डिवचलं आहे. सत्ता येथे जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आले नाही. हे सरकार किती दिवस चालेल हे माहीत नाही आज माइक ओढा ओढी सुरू आहे. उद्या काय काय ओढतील याचा भरोसा नाही. दोघांचं सरकार चालतंय, मात्र मंत्रिमंडळ विस्तार करायला हे का घाबरत आहेत? असा सवाल आज अजित पवारांनी पुन्हा केला आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post