जयसिंगपूर कुरुंदवाड व शिरोळ नगरपरिषदांसाठी १५ कोटीचा निधी मंजूर

 कुरुंदवाड मधील शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण होणार 

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती

प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर-दि.२० नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड या नगरपालिकांसाठी १५ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, निधी मंजुरी बाबतचा शासन निर्णय झाला असून  प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, या निधी मंजुरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सहकार्य केले असल्यामुळे आमदार यड्रावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. जयसिंगपूर शहरामध्ये वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत कामासाठी ५ कोटी रुपये तर जयसिंगपूर शहरांमधील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, त्याचबरोबर कुरुंदवाड शहरांमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी तसेच कुरुंदवाड नगरपरिषद येथे शॉपिंग सेंटर इमारत बांधकामासाठी १ कोटी रुपये, शिरोळ शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्यासाठी २ कोटी रुपये तर शहरात मल्टीपर्पज हॉल बांधण्यासाठी १ कोटी असा तालुक्यातील तिन्ही नगरपरिषदांना मिळून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे,

या पुढच्या काळात देखील या तिन्ही नगरपरिषदांसह शिरोळ तालुक्याच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विकास कामासाठी लागणाऱ्या निधीचा ओघ कायम राहील, सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहोत आणि शिरोळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार आहोत असे सांगताना पुढच्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रातील अनेक योजना आणि त्यासाठीचा लागणारा निधी मंजूर करुन आणण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post