आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा” या उपक्रमाचा फलक शहरातील ३०० ऑटो रिक्षावर लावण्याचा शुभारंभ पोलीस उपअधीक्षक मा. श्री बाबुराव महामुनी यांचे हस्ते करण्यात आला.प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकंरजी : येथे भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी यांचेवतीने आज इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या घराघरात व मनात आपल्या देशाबद्दल व आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा बद्दल राष्ट्र अभिमान जागृत करून व राष्ट्रीय वीरांना अभिवादन करण्यासाठी “आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा” या उपक्रमाचा फलक शहरातील ऑटो रिक्षावर लावण्याचा शुभारंभ पोलीस उपअधीक्षक मा श्री बाबुराव महामुनी यांचे हस्ते करण्यात आला.

स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशभर हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील ३०० ऑटो रिक्षावर “आझादी का अमृत महोत्सव,हर घर तिरंगा ” चे डिजिटल फलक लावणेत आले.याप्रसंगी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक मा श्री महादेव वाघमोडे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मा श्री विकास अडसूळ,लायन्स क्लब चे अध्यक्ष महेंद्र बालर, सदस्य संतोष कलंत्री,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे,इंदिरा ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष लियाकत गोलंदाज,महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष पिंटू जाधव,इचलकरंजी विध्यार्थी वाहतूक ऑटो रिक्षा युनियन चे अध्यक्ष मन्सूर सावणुरकर,छत्रपती शिवाजी महाराज रिव्हर्स ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष हरी पाटील,जीवन कोळी,अनिल बमन्नावर,राजू माळगे,अस्लम किल्लेदार,कयुम जमादार तसेच ऑटोरिक्षा चालक,मालक,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post