इचलकरंजी शहराच्या विकासाची गती वाढवणार

महापालिकेचे नूतन आयुक्त एस. व्ही. देशमुख यांची पदभार स्विकारताना ग्वाही

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी 

नगरपालिकेसाठी कायदा वेगळा आणि महानगरपालिकेसाठी कायदा वेगळा असतो. शिवाय मुख्याधिकारी यांचे पेक्षा आयुक्तांना मोठे अधिकार असतात, त्याचा फायदा शहराच्या विकासाची गती पाढविण्यासाठी होतो. त्या दृष्टीने जापण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही इचलकरंजी महानगरपालिकेचे नूतन आयुक्त एस. व्ही. देशमुख यांनी दिली. 

शुक्रवारी तात्काळ पदभार स्विकारला. त्यावेळी इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत प्रसारमाध्यमांशी आयुक्त देशमुख यांनी संवाद रूपांतर झाल्यानंतर नूतन महापालिकेचे साधला.


पहिले आयुक्त म्हणून एस. व्ही. देशमुख यांनी ते म्हणाले, सन १९९१ मध्ये प्रशासकीय सेवेत रुजू झालो. त्यानंतर विविध ठिकाणी मुख्याधिकारी तर सन २०१७ पासून धुळे, उल्हासनगर, पनवेल, भिवंडी येथे आयुक्त म्हणून कान पाहिले. भिवंडीनंतर आता इचलकरंजी महानगरपालिकेची जबाबदारी शासनाने सोपविली आहे. धुळे, उल्हासनगर, पनवेल, निवंडी याठिकाणी ज्या पध्दतीने कामकाज केले त्याचपध्दतीने सुरुवातीपासून नियोजनबध्द कामकाज करण्यावर आपला भर असेल. इथून पुढे इचलकरंजी शहरासाठी महानगरपालिकेचे कायदे लागू होणार असल्याने कार्यपध्दती बदलावी लागणार आहे. ही कार्यपध्दती समजून घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागणार आहे.

महानगरपालिकेला जीएसटी प्रतिकृती अनुदानाबरोबर सहाय्यक अनुदान मिळते. त्याचबरोबर विविध योजनातून मोठा निधी मिळतो. त्यामुळे महानगरपालिका आणि शहराचा सर्वांगिण अभ्यास करुन विविध योजना राबविणार  यावेळी आजी माजी नगरसेवक पदधिकारी व तसेच मनपा कर्मचारी प्रशासक मुख्यधिकारी  डाॕ प्रदिप ठेंगल कामगार अधिकारी विजय राजापुरे जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post