पी. ओ. पी (प्लास्टर ऑफ पॅरिस)च्या मुर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई


प्रेस मीडिया लाईव्ह :

 सातारा दि. 27 : सातारा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील  जल आणि वायु प्रदुषणामध्ये वाढ होऊ नये याकरिता उपाययोजना करणे गरजेचे असल्याने पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या वापरामुळे निसर्गामध्ये होणारे प्रदुषण आणि पार्यावरणामध्ये होणारे बदल व त्यापासून होणारा भविष्यातील धोका विचारात घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरीस) पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्पादन, वितरण व विक्री रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार प्रतिबंध करण्यात येत आसल्याबाबत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 


सातारा जिल्ह्यामध्ये पी.ओ.पी. पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरीस) पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मुर्ती उत्पादन, विकरण व खेरदी-विक्री करण्यावर दि. 6 जुलै 2022 पासून बंदी घलण्यात येत आहे. ज्या मुर्तीकांरांकडे पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरीस) च्या मुर्ती असतील त्यांना दि. 5 जुलै 2022 तयाची विक्री करण्याची मुभा देण्याता येत आहे. पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरीस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनविण्यास, वितरण करण्यास, आयात करण्यास दि. 6 जुलै 2022 पासूपन प्रतिबंध करण्यात येत असल्यामुळे यानंतर पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरीस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती आढळून आलस मुर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडनीय कारवाई करण्याता येईल. पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरीस) च्या सर्व  प्रकारच्या मुीर्त तयार करणाऱ्या, विक्री करणाऱ्यास तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 

 या आदेशाची अंमजबजावणी होण्याच्यादृष्टीने  तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशिर कारवाई करण्याकरिता स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी (नगरपालिका व ग्रामापंचयात) पोलीस विभागाचे अधिकारी कम्रचारी यांच्यासमरेव उप-प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ सातारा यांनी पथकाची निर्मिती करावी.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post