शहरतील परवाना धारक रिक्षाव्यवसायावर विना परवाना प्रायव्हेट टू व्हीलर टॅक्सी पॅसेंजर वाहतुकीचे अनधिकृत अतिक्रमण

 टू व्हीलर टॅक्सी पॅसेंजर वाहतुकीमुळे गुन्हे वाढण्याची शक्यता नाही का ?

नाहीतर भविष्यात प्रचंड उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख :

पुणे दि. १९ पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि उपनगरातील सर्व रिक्षा चालक मालक आणि परमिट होल्डर रिक्षा धारक यांनी सर्व आप-आपल्या  संघटना आणि त्यातील आपले धोरण बाजूला ठेवून आपल्या आजच्या पोटापाण्याच्या प्रश्ना साठी एकत्रित येण्याची काळाची गरज नाही का ?

  नाहीतर भविष्यात प्रचंड मोठ्या समस्या आणि उपासमारी ,बेरोजगारी ला सामोरे जाण्याची वेळ येणार ?.असे भाकीत होत आहे.  आज शहरात अनधिकृत कॅब टुरिस्ट परवण्यावर शहरात शहर परवाना  नसताना सुद्धा राज रोस पणे वेवसाय करत आहेतच, त्या मुळे  शहर परवाना  घेऊन व्यवसाय करणारे रिक्षचालकांना पोट भरणे अवघड होत असताना-च आता रिक्षा वाल्यांना पार संपवण्याच्या तयारी 

प्रायव्हेट टू व्हीलर वर विना परवाना विना बॅच पॅसेंजर वाहतूक सेवा पुरविली जात आहे. ह्या प्रकारे प्रायव्हेट टू व्हीलर वर विना परवाना विना बॅच पॅसेंजर वाहतूक  कुठल्याही कायद्यात महाराष्ट्र राज्या मध्ये बसत नाही,  तरी देखील  टू व्हीलर टॅक्सी वाहतूक शहरात अनधिकृत पणें चालू आहे, आणि  सरकार,वाहतूक विभाग आरटीओ कार्यालय संबंधित प्रशासन मूग गिळून गप्प बसून आहे . हि बाब अतिशय गंभीर आहे रिक्षाधारकांच्या येणाऱ्या पुढच्या भविष्या साठी. या साठी सर्व रिक्षचालकांनी व त्यांच्या संघटनेने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे, आणि या बाबत न्यायालयात अहवाण देण्याची गरज आहे.मानवी हक्क आयोगात देखील धाव घेण्याची तरतूद आहे त्या कडे देखील धाव घेऊन आपल्यावर होणाऱ्या वाहतूक व्यवसाय अतिक्रमणास रोखल पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवाय कंपनीने जे टू व्हीलर बनविली आहे त्या कमर्शियल वाहतूकीसाठी नाही, आणि महाराष्ट्र वाहतूक विभाग आरटीओ ने देखील त्यांना पांढरा नंबर प्लेट देऊन प्रायव्हेट व्हेईकल म्हणून घोषित केलेला आहे कमर्शियल व्हेईकल नाही, संविधानाला आणि कायद्याला डावलून टू व्हीलर वर पॅसेंजर  वाहतूक खुल्लम खुल्ला राज्यामध्ये होत आहे , यामुळे परवानाधारक रिक्षावाल्यांच्या पोटावर गदा येणारच, आणि राज्यात टू व्हीलर वर पॅसेंजर वाहतुकीमुळे गुन्हेगारी देखील वाढेल,

 टू व्हीलर वाहतूक धारक कॉर्पोरेट सेक्टर ला खूष करण्यासाठी संबंधित शासकीय घटक आणि राज्यातील राजकीय मंडळी डोळे उघडे ठेवून धीटपणे राज्यातील रिक्षावाल्यांच्या मुलाबाळांचे भविष्य काळोखात लोटण्याचा काम करत आहे, यासाठी राज्यातील संपूर्ण रिक्षावाल्यांनी आपली संघटना बाजूला ठेवून एकत्रित येण्याची गरज आहे नाहीतर भविष्यात प्रचंड उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे,

Post a Comment

Previous Post Next Post