महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज लागणार यासंबंधीचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले


प्रेस मीडिया लाईव्ह 

अन्वर अली शेख :

पुणे दि .१७ : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज लागणार आहे. यासंबंधीची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढलेली असून यंदा महाराष्ट्रभरातील तब्बल १६ लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यातील निकाल लागणार आहे. 

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेसाठी यावर्षी महाराष्ट्रातूनभरातून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत. त्यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली आहे. आज हा निकाल जाहीर होणार असून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल दुपारी एक वाजल्यापासून पाहता येणार आहे

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च - एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र ( इ . १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि . १७ जून , २०२२ रोजी दु . १:०० वा . ऑनलाईन जाहीर होईल . #SSC #results @CMOMaharashtra 

अशी माहिती पत्रकाद्वारे कळविले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

   सह संपादक ;अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post