मतदार राजा तूच आहेस तुझ्या प्रभागाचा खरा शिल्पकार

महापालिकेच्या निवणुकीसाठी जनता जनार्दनच ठरवणार आपल्या प्रभागाचा नगरसेवक..

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख  : 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आता लौकरच होणार , त्यासाठी राजकिय नेत्यांची पळापळ सुरू झाली असून विविध पक्षातले  लोक प्रतिनिधी आता कंबर कसून कामाला लागले असून. मीच आता नगरसेवक होणार असे दिवसा स्वप्ने पाहू लागले आहेत . 

* नगरसेवक म्हणजे आपल्या विभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत पाठवलेला लोकसेवक अशी संकल्पना असली तरी सर्वच नगरसेवक खरोखरच या संकल्पनेला पात्र ठरतात का...? 

*  काही नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्यांचा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा पालिकेत करतात तर काही निवडून गेल्याचा फायदा उठवत पाच वर्षात जास्तीत जास्त आपलीच 'कमाई' कशी करता येईल याचाच अधिक विचार करतात.

माझ्या संकल्पनेतला नगरसेवक हा सामान्यांचे प्रश्न सोडवणारा हवाच, त्याच प्रमाणे ते प्रश्न निर्माण होऊ नये त्याचा विचार करणारा देखील असावा. उदा. पाण्याची लाइन एकदम जुनाट झाली असेल तर त्वरित बदलून घेतली म्हणजे वारंवार दुरुस्ती वर होणारा खर्च, नासाडी होणारे पाणी वाचेल. रस्ते बांधताना कंत्राट दारांशी 'साटंलोटं' करणारा नसावा. कामा मध्ये कमिशन खाणारा नसावा ,  गरज असेल तेथे सिमेंट काँक्रिटचे पक्के रस्ते बांधावेत म्हणजे वारंवार खड्डे पडणार नाहीत.

स्वच्छ चारित्र्य, विभागातील समस्यांची माहिती असणारा असावा, नागरिकांना होणारा त्रास आपल्यालाही होत आहे याची जाणीव असणारा तो असावा. पालिका, सरकार झोपडपट्ट्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवते. त्याबाबत नगरसेवकाने नेहमी अपडेट राहिले पाहिजे. त्या योजना आपल्या भागात राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करावा तसेच आपण निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने किती पूर्ण केली याची माहिती लोकांमध्ये जाऊन त्याने द्यावी. लोकांकडून शाबासकीचे हार ,तुरे , स्वीकारताना त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत काय याचा कानोसा वारंवार घेत राहणारा असावा. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मी निवडून आलो तर भ्रष्टाचार करणार नाही. केल्याचे सिद्ध झाल्यास पदावरून पाय उतार होईन असे वचन त्याने मतदारांना दिले पाहिजे.


क्रमशः

प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख.

Post a Comment

Previous Post Next Post