कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्रजी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तर्फे विश्व - महासागर दिवसाचे आयोजनप्रेस मीडिया लाईव्ह

 एम डी शुक्रुल्लाह :

पिंपरी चिंचवड दि.8 निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्रजी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तर्फे दिनांक ८ जून २०२२ रोजी विश्व - महासागर दिवसाचे आयोजन करण्यात आले .

 या दिनाचे निमित्त साधून विद्यालयातील एन सी सी २ , महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या विद्यार्थनींनी पथनाट्य , वक्तृत्व घोषवाक्य , माध्यमातून स्वच्छ महासागराचे महत्व पसरवत समाजप्रबोधन केले . या विविध प्रभावी घोषवाक्यासहित या विद्यार्थिनीं च्या समूहाने निगडी प्राधिकरण प्रभागात महासागर प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम या संदर्भात जनजागृती रॅली काढली . 

कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय चेअरमन श्री . वालचंद संचेती साहेब यांनी विभागाच्या सदर समाजप्रबोधनाच्या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . मुख्याध्यापीका सौ . हेमलता नांगरे आणि एन सी सी सी टी ओ , सौ . गीता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .


प्रेस मीडिया लाईव्ह

  अन्वरअली शेख (सह संपादक )

Post a Comment

Previous Post Next Post