मताधिकाराचा वापर करून नगरसेवक निवडण्याची जबाबदारी जनतेची पण नगरसेवकाची जबाबदारी काय ?

 जनतेनेही आता आत्मचिंतन करण्याची गरज  

जनता व प्रभागाचा मी का माझ्या साठी जनता आणि प्रभाग ?  


प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही अति महत्वाच्या शहरवासीयांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलेले जनप्रतिनिधी यांनी आपल्या प्रति जवाबदारी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, हे विचार या नगर सेवकांच्या मनात येत असेल का ? की मी एका प्रभागात ज्या वेळी नगरसेवक म्हणून वावरतो तर माझी जनता, आणि  त्या प्रभागा प्रति जवाबदारी काय ? नगरसेवक निवडताना जनतेच्या अपेक्षा असतात की नगरसेवक आमच्या आणि प्रभागासाठी आहे परंतु निवडून दिलेल्या नगरसेवकाच्या मनात काय ? जनता व प्रभागाचा मी का माझ्या साठी जनता आणि प्रभाग ?  नगरसेवकाचा थाट मंत्र्यासारखा नसावा असे म्हणावे लागेल.

जनतेला असं वाटतं की नगरसेवकाच्या ह्या जबाब-दाऱ्या आहेत..

नागरिकांच्या नगरपालिकेमार्फत ज्या दैनंदिन गरजा आहेत, त्या गरजांसाठी अभ्यासपूर्ण रितीने व कार्यक्षमतेने नियोजनबध्द असा कायमस्वरूपी कार्यक्रम आखून देणे , हे नगरसेवकांचे महत्वाचे काम असून त्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रितरित्या हा कार्यक्रम, आणि धोरण राबविले पाहिजे म्हणजे  छोट्या-मोठ्या कामांसाठी नगरसेवकांचा, सेवकवर्गाचा आणि चतुर्थश्रेणी कामगारांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही.

नगरपालिकांच्या हद्दीमध्ये पुरेसा  रूंद रस्ता , पार्किंगच्या जागा , वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण  आणि विविध सार्वजनिक कारणांसाठी म्हणजे खेळाची मैदाने, प्रदूषण टाळण्यासाठी मोठमोठी उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे, व्यायामशाळा तसेच भाजीमंडई आणि मटण मार्केट यासाठी स्वच्छ व सर्वसोयींनी-युक्त अशी अद्यावत मार्केटस या सुविधांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणे. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन राबवण्या-साठी एकत्रित प्रयत्न करणे हे देखील नगरसेवकांचे आद्य कर्तव्य आहे. 

आपल्या शहरामध्ये पुढील १०० वर्षांचा धोरणात्मक दृष्टिकोन ठेवून कायमस्वरूपी कोणती कामे राबवावीत, याचाही अभ्यास सर्व नगरसेवकांना असणे अत्यंत आवश्यक आहे.कमीत कमी पैशात नगरपालिकेमार्फत जास्तीत जास्त सार्वजनिक काम कसे करून घेता येईल, याचाही नगरसेवकांनी जाणीव-पूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रभागातील नगरपालिकेशी संबंधित अशा समस्यांची नगरसेवकाला माहिती व जाणीव असावी.  नगरपालिकेच्या कायद्याची जाण असावी व समजही असावी.नगरपालिकेस निधी कसा उपलब्ध होतो आणि तो निधी कोणकोणत्या कारणासाठी खर्च करावा लागतो, याचेही ज्ञान नगरसेवकाला असावे. 

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नगरसेवकांना असावी. 

नगरपालिकेचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवून नगरपालिकेच्या अंदाज-पत्रकाचा अभ्यास करून दरवर्षी पुढील वर्षासाठी योग्य ते धोरण ठरवले जावे. राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून शहरातील विविध कामांसाठी कायमस्वरूपी कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेणे आणि त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नगरसेवकांना असावी. 

  कमी पैशात जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत. 

नागरिकांच्या करमणुकी-साठी अद्यावत टाऊन हॉल, नाट्य मंदिर असणे तसेच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी थिएटर अगर कला मंदिर असणे आणि त्या दृष्टीने पाठपुरावा नगरसेवकांनी केला पाहिजे. नगरपालिकेमार्फत सार्वजनिक हिताची विकासकामे करताना ती टक्केवारी शिवाय झाली पाहिजेत आणि कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत. 

प्रत्येक शहरामध्ये स्त्री-पुरूषांसाठी ठिकठिकाणी अद्यावत अशी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी व्हावी.छोट्या छोट्या दुकानगाळ्यांची मार्केट बांधून अशा मार्केटच्याद्वारे परदेशात जो करोडो रूपयांचा व्यापारधंदा केला जातो, त्याचाही नगरसेवकांनी अभ्यास करावा. आपल्या शहरामध्ये अशी योजना कार्यान्वित करता येते का?, असाही प्रयत्न करावा.

शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक  असणारी सरकारी यंत्रणा आणि दवाखाने, औषध पुरवठा,आणि आरोग्य योजना अंमलात आणणे, दैनंदिन साफसफाई, स्वच्छता, कचरा व घनकचऱ्याचे निर्मूलन वगैरे सर्व बाबींकडे काटेकारपणे लक्ष द्यावे.

नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी जागरूकतेने सर्वच बाबी म्हणजे भारनियमन, पाण्याची वॉल्व्ह सोडणे तसेच जमिनीखालून वेळोवेळी नगरसेवकांच्या किंवा काही वेळा नागरिकांच्या इच्छेप्रमाणे घातल्या जाणाऱ्या पाईपलाईनच्या गुंतागुंतीचा अभ्यास असणे आणि त्यावर एकत्रितरित्या विचार करून ठोस निर्णय घेणे हे महत्त्वाचे आहे.आणि  आपल्या प्रभागात नेहमी सामाजिक शांतता  सलोखा प्रस्थापित व्हावा या साठी नेहमी प्रयत्नशिल असावे, शैक्षणिक कार्यक्रमांसाठी नेहमी प्रोत्साहन योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील असावे.


प्रेस मीडिया लाईव्ह

 सह संपादक अन्वरअली

Post a Comment

Previous Post Next Post