बाळासो नाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा

विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती : अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातील एसटी वाहक बाळासो नाईक यांचा सेवानिवृत्ती निमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बाळासो कलागते ,हलकर्णीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गंगाधर व्हसकोट्टी ,नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी प्रशासनाधिकारी पितांबर हणबर , इचलकरंजी आगाराचे व्यवस्थापक संतोष डोंगरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी एसटी आगार येथून एस.टी. वाहक बाळासो नाईक हे नुकतेच ३३ वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार व सदिच्छा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते हे अध्यक्षस्थानी तर हलकर्णी गांवचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गंगाधर व्हसक्कोट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी प्रशासनाधिकारी पितांबर हणबर ,माजी पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे , इचलकरंजी आगार व्यवस्थापक 

संतोष बोगरे ,माई महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. सौ. निर्मला ऐतवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी बाळासो कलागते व प्रा.सौ.निर्मला ऐतवडे व मान्यवरांच्या हस्ते बाळासो नाईक व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता नाईक यांचा सत्कार करण्यात आला..यावेळी बाळासो कलागते ,दिपक सुर्वे , डॉ.गंगाधर व्हसकोट्टी , संतोष बोगरे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी बाळासो नाईक यांच्या एसटी महामंडळातील प्रामाणिक सेवाकार्याचा आढावा घेत त्यातून प्रत्येकाने आदर्श घेवून कार्यरत रहावे ,असे आवाहन केले.यावेळी मान्यवरांसह अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी तानाजी नाईक, सर्जेराव खरोशे, तातोबा हांडे,विजय खोत, एस.टी. आगाराचे कॅशियर बुध्दकीर्ती राक्षसमारे ,माई बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.शैला कांबरे ,स्वराज नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ.लता नाईक यांनी केले.या कार्यक्रमास माई महिला मंडळाच्या सेक्रेटरी डॉ. सौ. मीना तोष्णीवाल ,सदस्या डॉ.सौ सुमती सिदनाळे ,बिरदेववाडीचे माजी सरपंच शिवाजी नाईक ,प्रतिष्ठित नागरिक सुरेश खोत, सुरेश मुसळे ,विजय नाईक, राजाराम नाईक, सुधीर हणबर ,सचिन पाटील, डॉ.अनंत पाटील ,श्री. कागले , विजय खरोशे ,संयम हुक्किरे यांच्यासह मिञ मंडळी ,नातेवाईक , आप्तेष्ट व कुटूंबीय उपस्थित होते. 


     

Post a Comment

Previous Post Next Post