रायगड जिल्हा सहायक निबंधकाला ३० हजारांची लाच घेताना अटक



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटी

अलिबाग | रायगडचे सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांना एमआयडीसीतील जागेच्या कामासंदर्भात फाईलच्या एज्युडीकेशन करण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.सोमवारी रात्री झालेल्‍या या कारवाईमुळे जिल्‍हा निबंधक कार्यालयातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण...?

संबंधित तक्रारदारांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय आहे.तर एमआयडीसीमधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे काम त्यांना प्राप्त अधिकार पत्रांनव्ये करीत असतात.तक्रारदार यांच्याकडे एज्युडीकेशन कामाकरिता आलेल्या तीन फाईल्स त्यांनी कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस अलिबाग येथे जमा केल्या होत्या.तसेच त्या फाईल्सची ऑनलाइन फी भरून त्यास आवश्यक ते कागदपत्रे जोडून संबंधित कार्यलायात जमा केल्या होत्या.

मात्र, कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिस अलिबागयेथील सहजिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाअधिकारी देवेंद्र साटम यांनी त्या तीन फाईलचे एज्युडीकेशन करण्याकरिता प्रत्येक फाईल मागे फायनल ऑर्डर देण्याकरिता प्रत्येकी पंधरा हजार असे एकूण पंचेचाळीस हजार लाचेची मागणी केली होती.तसेच तक्रारदाराकडून नवीन सबमिट केलेली ऍग्रिमेंट फॉर जॉब वर्कची एक फाईलच्या पूर्तीकरिता आरोपी लोकसेवक यांनी पाच लाख रुपये व पूर्वी जमा केलेल्यातीन फाईल पैकी दोन फाईल व एक पेंडिंग फाईल अशा तीन एज्युकेशनच्या फाईलकरिता प्रत्येकी दहा हजार प्रमाणे तीन फाईलचे तीस हजार रुपये असे चार फाईल मिळून पाच लाख तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

        लाचलुचपत पथकाच्या कारवाईत काय..?

या घटनेची नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.त्‍या तक्रारीनुसार साटम यांच्या कार्यालयात सापळा रचून त्‍यांना लाच स्‍वीकारताना रंगेहात पकडण्‍यात आले.

यावेळी पथकाने कार्यालयाची झडती घेतली असता साटम यांच्‍या टेबलात ५ लाख ६३ हजारांची रोकड सापडली.ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post