काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे , आज घोषणा होण्याची शक्यता.



प्रेस मीडिया लाईव्ह :

 काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे सोपवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सोनिया गांधी यांनी देशभरातील काँगेसचे प्रदेशाध्यक्ष, पक्ष प्रभारी यांची खास बैठक घेतली.त्यात राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करावे अशी मागणी करण्यात आली. ऑगस्ट मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राहुल यांनी देशभर जनजागरण यात्रा काढावी अशीही सूचना झाली. सोनिया गांधी यांनी उद्या कार्यकारी समितीची बैठक बोलावली असून त्यातही हाच मुद्दा चर्चेला येईल असे सांगण्यात आले. उद्याच राहुल यांच्या नावाची घोषणा होईल असेही सूत्रांनी सांगितले. राहुल यांच्या यात्रेचा रोड मॅपही तयार असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने पक्षामध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पक्षातील सर्व पातळय़ांवर आता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना 50 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या तीनदिवसीय 'नवसंकल्प चिंतन शिबीर'मध्ये पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे नेते के. राजू यांनी दिली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. सामाजिक न्याय सल्लागार परिषदेचीही स्थापना करण्याची शिफारस या समितीने केल्याचे राजू यांनी सांगितले. ही परिषद संबंधित विषय हाताळेल आणि पक्षाध्यक्षांकडे त्यासंदर्भात शिफारशी करेल, अशी माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post