राज ठाकरेंनी त्या मुस्लिम पत्रकारांचे नाव जाहीर करावे...



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 नाशिक : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत नाशिकच्या मुस्लिम पत्रकाराचा उल्लेख केला. मूळात असा कोणताही पत्रकार ठाकरे यांना भेटला नसताना त्यांनी मुस्लिम पत्रकारांचा अपमान केला असून समाजात संशयास्पद वातावरण निर्माण होत आहे.राज ठाकरे यांच्या भाषणाने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून याबाबत गांभीर्याने विचार करून कारवाई करावी, अशी मागणी नाशिकमधील मुस्लिम पत्रकारांनी अजित पवार यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना नाशिकच्या मुस्लिम पत्रकाराने पुण्यात आपली भेट घेत भोंग्यांबाबत तक्रार केली. माझं लहान मुलं लाऊडस्पीकर मुळे झोपेना. ते आजारी पडायला लागलं. झोप लागली तर अजान सुरू होते अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे केल्याचे राज ठाकरे म्हणाले. मात्र, राज यांच्या या वक्तव्यावरून नाशिकमधील मुस्लिम पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी त्या मुस्लिम पत्रकारांचे नाव जाहीर करावे, उगाचच नाशिकच्या मुस्लिम पत्रकारांची बदनामी करू नये. ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे समाजांतर्गतच आमच्याकडे संशयास्पदरित्या बघितले जात आहे. यामुळे समाजातच दुही माजवण्याचा हा प्रयत्न आहे. त्या मुळ वकिलांमार्फत राज ठाकरे यांना नोटीस पाठवणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी मुस्लिम पत्रकारांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत ठाकरेंच्या भाषण प्रकरणी गांभीर्याने घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी इम्रान शेख, तबरेज शेख, फहीम शेख, वसीम शेख, तौसीफ शेख आदी उपस्थित होते.

औरंगाबादच्या सभेत पत्रकाराचे नाव घेत राज ठाकरे यांनी स्टंटबाजी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी नाशिकमध्येह त्यांनी प्रचार सभेदरम्यान सभेचे प्रसारण काही केबल चालकांनी बंद केल्याचा आरोप केला
होता. मात्र, प्रत्यक्षात खुलासा केला असता असे कोणतेही प्रसारण बंद केले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हीदेखील स्टंटबाजी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

"राज ठाकरे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनाच भेटत नाही, मग नाशिकच्या पत्रकारांना पुण्यात कसे भेटतात. त्यांना त्यांचा पक्ष वाढविण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू मुस्लिम पत्रकारांना यासाठी बदनाम कशासाठी करता? जे कोणी पत्रकार त्यांना भेटले त्यांचे नाव ते का जाहीर करत नाहीत? ठाण्यात म्हणतात पुण्याचा पत्रकार आहे. औरंगाबादच्या सभेत सांगतात..नाशिकचा पत्रकार आहे. नेमकं त्यांनाच माहित नाही असे दिसते"

 : तबरेज शेख, पत्रकार

Post a Comment

Previous Post Next Post