बेडकिहाळ येथे 16 मे रोजी स्वर्गीय.गोपाळदादा पाटील यांचे पुण्यस्मरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार.....

 




    बेडकिहाळ येथे स्वर्गिय गोपाळदादा  पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणीय कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने त्यांचे चाहते व मान्यवर आदरांजलीसाठी उपस्थितीत राहणार आहेत. 



प्रेस मीडिया लाईव्ह :

 बेडकिहाळ कर्नाटक :

स्वर्गीय गोपाळदादा पाटील हे बेळगाव जिल्ह्यातील एक खंबीर नेतृत्व म्हणून कार्य केले. त्यांच्या मध्ये समाज कार्याचे कौशल्यता होती. ते एक धडाडाचे सहकार नेते म्हणून अनेक क्षेत्रांमध्ये पदभार सांभाळत होते. विविध संघ संघटना, संस्था शैक्षणिक व राजकीय अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणुन ओळखले जात होते. स्व.गोपाळदादा पाटील यांना काका व दादा म्हणुन अनेक सामाजिक, राजकीय मोठ-मोठे नेते संबोधत होते. त्यांचे पुण्यस्मरण  दिनांक 16 रोजी सकाळी 10.00 वा. फार्म हाऊस, बंगला परिसरात प्रथम पुण्यस्मरण व आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव युवा नेते दत्तकुमार पाटील यांनी पत्रकार परिषेदेत दिली. त्यावेळी त्यांची सुन‌ सौ.सुप्रिया पाटील म्हणाल्या की आमचे सासरे स्वर्गिय. गोपाळदादा पाटील-काका  यांचे तिथी प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातुन अनेक क्षेत्रातील नेते व मंडळी तसेच मान्यवर व विविध संघ, संघटना, संस्थेचे पदाधिकारी व ग्राम पंचायतचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.

 पत्रकार परिषेदेवेळी स्वर्गीय गोपाळदादा पाटील यांच्या पत्नी वासंती पाटील, शंकरदादा पाटील, संजय पाटील, विलास पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post