बेडकिहाळ येथे समाज प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला



प्रेस मीडिया लाईव्ह :

बेडकिहाळ कर्नाटक :

बेडकिहाळ :   साहित्य संस्कृती आणि शेती विचार मंच सोशल फाउंडेशन बेडकिहाळ यांच्या वतीने दिनांक 17 रोजी कसमावती मिर्जे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 


कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करन्यात आले. सुरेश देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. त्यावेळी  ख्यात नटी अक्षता पांडवपुरा, मंड्य जिल्हा, सौ.विद्या देसाई ग्राम पंचायत अध्यक्षा, अंजली पैलवान हेरवाड, सुरेश देसाई, जेष्ठ नेते जयकुमार खोत, जेष्ठ साहित्यिक डी एस चौगुले, सौ.सुप्रिया पाटील उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एन.दाभाडे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की ख्यात नटी अक्षता पांडवपुरा यांचे एकपात्री नाटक  समाज प्रबोधनपर ठेवला आहे. समाज परिवर्तन होणे हे काळाची गरज आहे असे ते म्हणाले. पुढे रणरागिणी अंजली पैलवान म्हणाल्या की विधवांना स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे.त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये मान सन्मान मिळावा. व त्यांना ही सर्व हक्क मिळावे. असे त्या म्हणाल्या. ख्यात नटी अक्षता पांडवपुरा मंड्य जिल्हा यांनी एकपात्री नाटक सादर करुन समाजाला सांगितले की माझा लढा समानतेसाठी आहे. स्त्री पुरुष या दोघांनाही समान हक्क मिळाला पाहिजे. हाच या नाटकाचा उदेश आहे असे त्या म्हणाल्या. 

 त्यावेळी लक्ष्मी पागनीस तसेच साहित्य संस्कृती आणि शेती विचार मंच सोशल फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, ईतर संघ संघटना संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी चौगुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन आर.बी.वाजंत्री यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post