ब्रेकिंग न्यूज : ससून रुग्णालय या ठिकाणी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देत असल्याचे रॅकेट उघड

 खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रॅकेट शोधण्यासाठी ससून रुग्णालयाने आता त्रिसदस्य चौकशी समिती नेमली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : ससून रुग्णालय  या ठिकाणी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देत असल्याचे रॅकेट उघड  झाले आहे त्या मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे . आता खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रॅकेट शोधण्यासाठी  ससून रुग्णालयाने  त्रिसदस्य चौकशी समिती नेमली आहे .पैसे देऊन खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर ही समिती नेमण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून अशा प्रकारचा काळाबाजार होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारचे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले आहेत ? रुग्णालयातील किती जणांचा यात सहभाग आहे ? याची सुद्धा पडताळणी  चौकशी समिती करणार आहे. ज्यांना हे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, त्यांनी कोण कोणत्या योजनांचा लाभ घेतला, याचा तपास सुद्धा चौकशी समिती करणार आहे.

रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी नुकतीच ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले होते. तावरे हे विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. तर एका महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर वैद्यकीय विभागाने रुबी हॉल क्लिनिक आणि ससूनच्या सर्वोपचार अधीक्षकांवर कारवाई केली आहे. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते.

Post a Comment

Previous Post Next Post