वसंत मोरे यांनी आज पक्षांतर्गत वादाला वैतागून पक्षाचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडला

माजी नगरसेवक आणि मनसेचे  शहराध्यक्ष वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान..

प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उप संपादक )

 पुणे : माजी नगरसेवक आणि मनसेचे  शहराध्यक्ष वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात घेतलेल्या भूमिके वरुन नाराज होवून आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात आले.अशातच वसंत मोरे यांनी आज पक्षांतर्गत वादाला वैतागून पक्षाचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडला असल्याचे वृत्त खात्रीलायक सुत्रांनी दिले आहे. विभाग प्रमुख, मनसेचे प्रमुख नेते असलेला व्हॉट्सॲप ग्रुप वसंत मोरे यांनी सोडला आहे.

याशिवाय राज ठाकरे यांच्या कडूनही मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे वृत्त आहे. पुण्यातील नाराज मनसे पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि साईनाथ बाबर यांना 'शिवतीर्थ'वर पाचारण केले आहे. मात्र यात शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, अशा भूमिकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होवून या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमधील  चांदिवली, कुर्ला आणि अन्य भागात मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली आहे. तर काही ठिकाणी भोंगे लावण्याचा प्रयत्न करत असलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.वसंत मोरेंनी दिला होता राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यास नकार :

मात्र राज ठाकरे यांच्या याच आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले 

Post a Comment

Previous Post Next Post