आज ज्या पद्धतीने पक्षा मध्ये खांदेपालट झाले ते दुर्दैवी ..मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :  वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हलाकपट्टी करण्यात आल्यानंतर माजी मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे चांगले काम करतात. परंतु आज ज्या पद्धतीने पक्षा मध्ये खांदेपालट झाले ते दुर्दैवी आहे.वसंत मोरे यांनी प्रभाग शांत ठेवण्याची भूमिका घेतली, परंतु राजकीय डाव खेळून त्यांच्या विरोधात खेळी खेळली गेली, असे त्या म्हणाल्या.

वसंत मोरे लोक प्रतिनिधी होते, असे म्हणत पक्षांतर्गत धुसफुसीला कंटाळून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्याचे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. तसेच मी पक्ष सोडला तेव्हा बंधू (वसंत मोरे) ताईंनी राजकीय आत्महत्या केल्याचे म्हटले होते. परंतु आज वसंत मोरे यांची राजकीय हत्या झालीय की आत्महत्या केलीय हे उभा महाराष्ट्र बघतोय ही दुर्दैवी गोष्ट आहे.

मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड .

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. त्यावरून वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई! असं ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, भोंग्याच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना पुणे शहराच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे.

वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आता आमच्याकडे यावे ... राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप .

पुण्यात त्यानंतर राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीने या वादामध्ये उडी घेतली आहे. वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आता आमच्याकडे यावे त्यांना राष्ट्रवादीत नक्कीच प्रवेश दिला जाईल. अशी खुली ऑफर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.''

जगताप म्हणाले, राज ठाकरे गुढीपाडव्याला मांडलेले विचार सामान्य मराठी माणसाला न पटणारे आहेत. मनसेच्या समस्त कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याच आवाहन मी करत आहे. वसंत मोरे यांचेही पक्षात स्वागत आहे. आपण कुठल्याही जातिधर्मात न अडकता शहर, राज्य, देशाचा विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत यावे. त्यांचा योग्य तो मानसन्मान जपला जाईल.



Post a Comment

Previous Post Next Post