आधार संस्थेतर्फे पुरस्कारांची घोषणा; शनिवारी वितरण

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी/प्रतिनिधी -

सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना आधार भूषण, आधार गौरव व आधार विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या गौरव व विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शनिवार ३० एप्रिल रोजी दुपारी ५ वाजता पुरस्कार वितरण सोहळा कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न होत आहे, अशी माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर, बैतुलमाल कमिटी अध्यक्ष लतिफ गैबान, आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर, ईद फेस्टिवलचे उपाध्यक्ष नुरमहंमद बागवान, संस्था उपाध्यक्ष हारुण पानारी यांनी दिली. 


यावर्षी आधार संस्थेच्यावतीने हाजी सलीम बागवान यांना ‘आधार भूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तर अहमद मुजावर (सामाजिक), बापूसाहेब चौधरी (अभियंता), डॉ. आयुब विजापूरे (वैद्यकिय), डॉ. असिफ सौदागर (वैद्यकिय) व अ‍ॅड. रियाज बाणदार (कायदा क्षेत्र) यांची ‘आधार गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर गौसुलआजम पटेल, निलोफर तांबोळी, डॉ. आसिरा फकिर व मोहसीन मुल्ला यांना ‘आधार विशेष’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  शिवार सलीम म्हालदर यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण समारंभ अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांचे हस्ते आणि राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक नितीन जांभळे, शशांक बावचकर, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सुनिल महाजन, उद्योजक अस्लम सय्यद, अजीजशेठ खान, जहाँगिर पटेकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याचदिवशी सकाळी १० वाजता समाजातील गरजू लोकांना खीर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर व आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते व सयाजी चव्हाण, प्रकाश दत्तवाडे, आदिल फरास, धोंडीलाल शिरगांवे, रणजित जाधव, कैश बागवान आदींची उपस्थिती असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post