ससून मध्ये बनवलेल्या स्वतंत्र 11 मजली इमारती मध्ये ससून मधील अन्य विभाग स्थलांतरित करण्यात आले



प्रेस मीडिया लाईव्ह :


जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )

पुणे - करोना बाधितांची संख्याचे प्रमाण आता कमी झाल्याने त्यांच्या साठी ससून मध्ये बनवलेल्या स्वतंत्र 11 मजली इमारती मध्ये ससून  मधील अन्य विभाग स्थलांतरित करण्यात आले आहेत त्यामुळे आता या विभागांना मोठी जागा मिळाली आहे.


ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या 11 मजली नव्या इमारतीचा उपयोग करोना बाधितांसाठी गेल्या दोन वर्षांपासून केला जात होता. या मध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयु) आणि अन्य विभाग बनवण्यात आले होते. करोना बाधितांचे उपचार बंद करण्यात येणार नसून, यातील अतिदक्षता विभाग आणि तो मजला करोना बाधितांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. 

नव्या इमारती मध्ये कान, नाक, घसा विभाग, नेत्ररोग विभाग, अस्थिरोग विभाग, उरोरोग विभाग (टीबी), बालरोग विभाग हे स्थलांतरित केले आहेत. याशिवाय, यामध्ये कान, नाक, घसा, नेत्र विभाग आणि अस्थिरोग विभागासाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटरही सज्ज करण्यात आले आहे.

या शिवाय, रुग्णांसाठी पुरेशा खाटाही वाढल्या असून, काही स्वतंत्र, स्वतंत्र वॉर्डही बनवले आहेत. त्यामुळे याठिकाणची रुग्ण घेण्याची क्षमतादेखील वाढली आहे. या विभागांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अन्य रोगांपेक्षा अधिक असते, त्यामुळे जास्त जागा लागत असल्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे या इमारतीत स्थलांतरित केले आहे.

याशिवाय, या 11 मजली इमारतीमध्ये संपूर्ण एक मजला गंभीर आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग बनवले होते. सध्या त्याची स्थिती बदलण्यात येणार नाही. मात्र, नजीकच्या काळात तेथे 'सर्जिकल आयसीयु' बनवण्यात येणार आहे.
जुन्या इमारतीत या विभागांच्या 'ओपीडी' मात्र तशाच राहणार आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post