शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळांडूचा पुणे महानगरपालिके तर्फे पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून सत्कार

बालगंधर्व रंगमंदिर येथे १२ मार्च २०२२ रोजी खेळांडूचा पुणे महानगरपालिके तर्फे पारितोषिक व सन्मानचिन्ह  प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह

अनवरअली शेख : (सह.संपादक )

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य  मिळविणाऱ्या व क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱ्या खेळांडूना व क्रीडा मार्गदर्शक यांना महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करून वेळोवेळी सन्मानित करण्यात आलेले आहे . 

क्रीडा विभागाकडील सुधारित क्रीडा धोरणातील योजनेनुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार करणे या योजनेअंतर्गत सन १ ९ ७० ते २०१८ या कालावधीतील सत्कार समारंभ प्रसंगी एकूण २७२ पुरस्कार प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना दि . १२/०३/२०२२ शनिवार रोजी सकाळी ११.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे . 

सदर कार्यक्रमाकरिता पुरस्कार प्राप्त खेळाडू व सोबत एक व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात येत असून कार्यक्रमाच्या किमान अर्धा तास पूर्वी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे .अशी माहिती  संतोष वारुळे उप आयुक्त क्रीडा विभाग पुणे महानगरपालिका यांनी प्रेस मीडिया लाईव्ह ला पत्रकाद्वारे कळविले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

 

Post a Comment

Previous Post Next Post