राजसाहेबांचा लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे ९ मार्चला पुण्यात होणार पक्षाचा वर्धापन

 वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमिवर देहूरोड येथील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु ..प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे जिल्हा प्रतिनिधी :  अन्वरअली शेख

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. प्रथमच पुणे येथे पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार असून, यापूर्वी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला होता. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ९ मार्च, २००६ रोजी करण्यात आली. त्यामुळे हा दिवस मनसैनिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यातच लवकरच मुंबईसह पुणे, नाशिक, मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने या वर्धापन दिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती कशी असणार, स्वबळावर निवडणूक लढण्याचे य़ापूर्वीच निश्चित करण्यात आल्याने राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्या ९ मार्चला मनसेचा १६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमिवर देहूरोड येथील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. ढोल ताशा च्या गजरात देहूरोड येथून ४ वाजता ही  रॅली संपूर्ण देहूरोड शहर, बाजारपेठ, शंकर मंदिर या मार्गाने पुण्यासाठी रवाना होणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष जॉर्ज दास ,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे देहूरोड शहर अध्यक्ष मलिक शेख यांनी दिली. गणेश कला क्रीडा मंच येथे हा भव्य वर्धापनदिनाचा सोहळा सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी :अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post