शासनाने ऑटोरिक्षांना नव्या वाहतूक कायद्यातून वगळण्याची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

शासनाने प्रवाशांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ऑटोरिक्षांना नव्या अन्यायी वाहतूक कायद्यातून तात्काळ वगळावे ,अशा मागणीचे निवेदन आज रविवारी ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मन्सूर सावनूरकर व चालक मालक टेम्पो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज इचलकरंजीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सादर केले.

शासनाने सर्व वाहनांसह ऑटोरिक्षांना देखील नव्या वाहतूक कायद्यान्वये विविध दंडाची आकारणी केली आहे.त्याला आक्षेप घेवून ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने राज्यव्यापी निवेदन शासनाला सादर केले होते. तसेच मागील वर्षी दि.31मार्च रोजी केंद्र शासनाने हरकती मागवल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध ऑटोरिक्षा संघटनेने मुदतीच्या आत हरकती नोंद केल्या होत्या. परंतू ,सदर हरकतींचा विचार न करता व कुठल्याही प्रकारची संधी न देताच एकतर्फी अन्यायी दंडात्मक रकमेचीआकारणी ऑटोरिक्षांवर लावण्यात आली आहे.याच अनुषंगाने ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मन्सूर सावनूरकर व चालक मालक टेम्पो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज इचलकरंजीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन सादर केले.यामध्ये प्रवाशांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ऑटोरिक्षांना शासनाने नव्या वाहतूक कायद्यातून तात्काळ वगळावे,अशी आग्रही मागणी करण्यात आली असून यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने राज्यासह जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयासमोर येत्या २१ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी मंञी छगन भुजबळ यांनी ऑटोरिक्षांच्या दंडात्मक आकारणीबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.या शिष्टमंडळात पिंटू जाधव , लियाकत गोलंदाज , जीवन कोळी ,शाहीर जावळे ,शब्बीर मुल्लाणी , रसूल सय्यद यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post