कवितांची मैफिल व बहारदार कथाकथनाने साहित्य संमेलन बहरले

 शिरोळ येथे दीनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाचा समारोप..

प्रेस मीडिया ऑनलाइन :

शिरोळ : प्रतिनिधी- 

येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित  दिनबंधू ,भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनात नामवंत व नवोदित कवी - कवयित्रींच्या एकापरास एक जबरदस्त काव्य वाचनाबरोबर बहारदार कथाकथन रंगले. संमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागातून साहित्यिक संमेलनात सहभागी झाले होते.

     



येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दलितमित्र दीनबंधु दिनकरराव  यादव स्मृती ७ वे साहित्य संमेलन झाले. दुसऱ्या सत्रात विजय जाधव (अंकलखोप) यांच्या बहारदार कथाकथनाचा आस्वाद रसिकांनी घेतला. सांगली आकाशवाणी केंद्राचे हिंदी अधिकारी सच्चिदानंद आवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

            त्यानंतर तिसऱ्या सत्रात साहित्यिक व कवीवर्य भीमराव धुळूभुळू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निमंत्रित कवींच्या काव्यसंमेलनात अनेक कवींनी बहारदार कविता सादर केल्या. यामध्ये कवी उदय शिरोळकर (थोडं दूध द्या मला), डॉ. राजश्री पाटील ( माई), दस्तगीर नदाफ (प्रीत उधळली ), सच्चीदानंद आवटी ( नथुराम ), नीलम माणगावे (शेपूट फुटलेली माणसं),

सुनील इनामदार  (वेदना ), सचिन इनामदार (गुलाल ), सुभाष हापटे ( गझल ),

विजया बन्ने ( स्वाभिमान), नाना हलवाई ( रोज जगताना ), दिलीप कुलकर्णी (कलंदर), भीमराव धुळूभुळू (गझल) यांच्या कवितांनी दाद मिळवली.

             दरम्यान सायंकाळच्या सत्रात नवोदित कवींचा काव्य कट्टा सादर झाला. अध्यक्षस्थानी कवयित्री विजया बन्ने होत्या. सूत्रसंचालन कवी दर्शन वडेर यांनी केले.

यामध्ये  सुवर्णा पवार, पांडुरंग जमखिंडीकर, विष्णू सुतार, विवेक चुडमुंगे, विष्णू वासुदेव, सुधाकर कुपवाडकर, अमन पटेल, कवी सरकार, सुरेश पुजारी, राजकुमार रुगे, विजयराज कोळी, आर. के. मगदूम, ऋषिकेश चौगुले, महेश काळिंगे, संचित कांबळे, रामचंद्र चोथे, बापूसो गंगधर, संजय सुतार, कल्पना घोळवे, डॉ. कुमार पाटील, पृथ्वीचंद्र माचरेकर आदी कवींचा  संमेलनात सहभाग होता.

             संमेलन यशस्वी करण्यासाठी

शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, उपाध्यक्ष दगडू माने, सचिव प्रा. संजय पाटील, प्रा. अनिल कुंभार, प्रा. मोहन पाटील, किरण पाटील ,विजया बन्ने, शंतनू यादव यांच्यासह स्वागताध्यक्ष दलितमित्र अशोकराव माने, संजय सुतार, नाना कदम, भगवान कोळी, विराज यादव तसेच विविध संयोजन समिती व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post