पेण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी परेश संजय मते याला वीस वर्षाचा कारावास

  व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष सत्र न्यायाधीशांनी सुनावली .

प्रेस मीडिया ऑनलाइन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी  : सुनील पाटील

आरोपीनी एका बारा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते आरोपी परेश संजय मते यांनी सदर मुलीशी फेसबुकवर मैत्री केली होती आरोपी परेश संजय मते याने सदर मुलीशी फेसबुकवर मैत्री करत जवळीक साधली होती. यानंतर फोनवरून सवांद साधून आरोपीने पिडीतेला तिच्या अज्ञानपानाचा व एकटेपणाचा फायदा घेवून तिला आपटा फाटा येथे पळवून नेले व तेथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

याबाबत फिर्यादी पिडीतेच्या वडिलांनी पेण पोलीस ठाणे येथे तक्रार केल्यानंतर पोलीसांनी भा.द.वि कलम 363,354,376 (2) (1) (प) तसेच पोक्सो कायदा कलम, 2012 नुसार कलम 3,4,5 (ल),7,8,9 ,(ल),10, 11,12,व 15 या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता.

त्यातील पोक्सो कलम 2012 नुसार कलम 3 व 4 (2) प्रमाणे मा.न्यायालयाने परेश मते यास दोषी पकडून 20 वर्षाची शिक्षा व रक्कम 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकणात सदर केसचा पेण पोलीस ठाणेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी जलदगतीने तपास पूर्ण केले. सदर खटल्यात शासकीय अभियोक्ता भूषण साळवी यांनी 8 साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला तसेच पैरवी कर्मचारी महिला पोलीस अंमलदार प्रियंका नागावकर, पोलीस हवालदार सचिन खैरनार, पोलीस अंमलदार सिद्धेश पाटील, पोलीस अंमलदार कारखिले यांची महत्वाची भुमिका होती

Post a Comment

Previous Post Next Post