'पहले हिजाब, फिर किताब…



प्रेस मीडिया ऑनलाइन :

बीड - भारतीय संस्कृती आणि येथील एकात्मतेचे धडे शालेय जीवनात देण्यात येतात. परदेशातही भारतीय संस्कृतीचा आदराने उल्लेख केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे तरुणाईच्या धर्मिक उन्मादाचं विष कोण पेरतयं असा प्रश्न निर्माण होतोय.याचाचं सारिपाठ आज कर्नाटकमध्ये पाहायला मिळाला. यामुळे कर्नाटकात धार्मिक तणाव निर्माण झाला असून तीन दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या वादाचे पडसाद आता बीडमध्ये उमटले आहेत. 'पहले हिजाब, फिर किताब… क्यों की हर किमती चीज पर्दे में हीं होती है', अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आलेले आहेत. व्हायरल होणारे बॅनर एका विद्यार्थी नेत्याने लावले आहे. हे बीड शहरातील शिवाजी महाराज चौक, बशीर गंज चौक, राजुरीवेस परिसर या ठिकाणी लावले गेले आहेत. या विद्यार्थी नेत्याचे नाव फारुखी लूखमान आहे. हिजाब किताबच्या तुलेनवरुन बीडमधील बॅनर शहरात तसंच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये एका मुस्लीम युवतीसमोर धार्मिक घोषणा देण्याचं लाजिरवान कृत्य भगवा गमछा गळ्यात परिधान केलेल्या युवकांच्या टोळक्याने केलं. त्याला प्रत्युत्तर देत युवतीने देखील 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या. या घटनेमुळं देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मांडा प्री युनिवर्सिटी कॉलेजमध्ये एका मुस्लीम युवतीसमोर भगवा गमछा परिधान केलेल्या महाविद्यालयीन युवकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत गैरवर्तन केलं. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये हिजाब विरुद्ध भगवा गमछा वाद पेटला असून धार्मिक तणाव निर्माण झाला आहे.

व्हिडीओमध्ये, एक कॉलेज तरुणी तिची स्कूटर पार्क करून कॉलेजच्या इमारतीच्या दिशेने जात असताना भगवा गमछा परिधान केलेल्या मुलांचा एक गट 'जय श्री राम' असा जयघोष करत बुरखा घातलेल्या मुलीकडे जातो. मुस्लिम तरुणीनेही प्रत्युत्तरात 'अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post