छ. शिवाजी महाराजांची जयंती बेडकीहामध्ये शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट कडुन उत्साहात साजरी ....


प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :

      बेडकीहाळ येथे शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयांमध्ये बेडकीहाळ ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा सौ.विद्या देसाई व उपाध्यक्ष जयश्री जाधव तसेच ग्राम पंचायत चे सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. त्यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेचे पूजन अध्यक्षा व उपाध्यक्ष यांच्या हस्ते हार घालून पुजा करन्यात आले. तसेच श्रीफळ संजय देसाई यांच्या हस्ते वाढवण्यात आले.

  मनोगतामध्ये ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील यांनी आपल्या मनोगतमध्ये छ. शिवाजी महाराज यांचे विचार आजच्या काळामध्ये गरजेचे आहे. जाती पलिकडे जाऊन समाजामध्ये  सर्व धर्मामध्ये आज विचारांची गरज भासत आहे. तसेच शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे व ट्रस्ट यांचे कौतुक केले. कारण हे ट्रस्ट प्रत्येक महाहमानवांची जयंती फार उत्साहात साजरी करत असतात. असे अनेक उपक्रम समाजाला प्रेरणा देण्यासाठी वर्षंभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. समाजासाठी शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट सारखी ट्रस्ट गरजेचे आहे. असे म्हणाले. 

   ग्राम पंचायत अध्यक्षा सौ. विद्या देसाई यांनी आपल्या मनोगतमध्ये म्हणाल्या की, छ. शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये स्त्रियांना चांगली वागणूक आणि संरक्षण मिळत होते. मात्र आता स्त्रियांवरं अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. सर्वांनी छ. शिवाजी महाराजांचे विचार प्रेरित करावे करावे असे त्या म्हणायला. तसेच ग्राम पंचायत उपाध्यक्षा जयश्री जाधव व सौ. मेघा मोहिते माजी चेअरमन यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. 

     त्यावेळी माजी उपाध्यक्षा सौ. स्वाती कांबळे, ग्राम पंचायत सदस्य सौ.महादेवी यादव, सौ.सुवर्णा भत्ते, निर्मला कोळी, पोर्णिमा चिंचणे,संजय पाटील,पिंटु जाधव, गंगाधर सुर्यवंशी, नाना पाटील, जीवण यादव, महमंद मुल्ला, सचिन पाटील, शिरीष कांबळे, पटेल सर, अशोक यादव, राजु घाटगे हे उपस्थित होते. सर्वांना मिठाई वाटुन जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  ऍड. प्रिती हट्टीमणी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post