क्राईम न्यूज : स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांच्या पथकाने रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दी मधील खुंट्याची वाडी येथे जाऊन तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

 रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुधे ,रायगड वरिष्ठ पोलीस क्राईम ब्रांच श्री दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील


एका महिन्याच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांच्या पथकाने रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दी मधील खुंट्याची वाडी येथे जाऊन तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या रायगड गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकी तील पोलीस हेड कॉन्स्टेबल 21 39 झेमसे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे इलेक्ट्रिक पंप चोरीस गेलेल्या तीन इस मास रसायनी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले

    सविस्तर बातमी खालील प्रमाणे....

 रसायनी पोलीस ठाणे गु.र.न.04/2022  भा.द.वि. कलम 380 हा गुन्हा दिनांक 06/01/2022 रोजी दाखल आहे.       सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी यांचे फार्म हाऊस मधुन 24,500/- रुपये किमतीची  इलेक्ट्रीक केबल व पंप चोरी केली होती.                                 

  सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीतील पोह 2139 झेमसे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे  गुन्हयतील आरोपींची माहिती मिळवून PSI कदम, पोहवा/1820 पाटील, पोना/1191 म्हात्रे ,पोहवा/795 सावंत असे रसायनी पाताळगंगा येथील खुंट्याची वाडी येथे जाऊन आरोपींना अटक केली.

1)संतोष सिताराम वाघे, वय-27वर्ष 

2)बबलू राजू पवार, वय-31वर्ष 

3) ज्ञानेश्वर शांताराम वाघे , वय-19 वर्ष 

यांना ताब्यात घेऊन अधिक  चैकशी केली असता, सदर आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल  व हस्तगत मालमत्ता :- 24,500/- रुपये किमतीची केबल व पंप हस्तगत करण्यात आला आहे . गुन्ह्यातील अटक आरोपी व माल पुढील तपासकामी रसायनी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.    

सदरची कामगिरी PSI कदम, पोहवा/2139 झेमसे, पोहवा/1820 पाटील, पोना/1191 म्हात्रे, पोहवा/795 सावंत चालक पोहवा/ कोरम या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post