विशेष बातमी : १९३० सालाच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल एका सांगली कराने बनवले ...

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सांगली : राज्यात नुकताच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रेय लोहार यांनी अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन याच्या माध्यमातून जुगाड जिप्सी तयार केली होती त्यांच्या नंतर आता सांगली मधील आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे.अवघ्या ३० हजार रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजिन असा जुगाड करत १९३० सालाच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल एका सांगली कराने बनवले आहे.

आठवी पर्यंतच शिक्षण झालेल्या अशोक आवटी नावाच्या मॅकेनिकल कारागिराने ही भन्नाट जुगाड गाडी बनवली आहे. सांगली शहरातल्या काकानगर या ठिकाणी राहणाऱ्या अशोक आवटी या मेकॅनिकल कारागिराने आपल्या कल्पक बुद्धीने ही चार चाकी गाडी बनवली आहे.आवटे यांचे ट्रॅक्टर आणि दुचाकीचा गॅरेज आहे.

२०१९ च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये युट्युबवर त्यांनी काही व्हिडिओ बघितले आणि आपल्या लहान मुलांना काही तर वेगळी गोष्ट देण्याच्या हिशोबाने एखादी चारचाकी गाडी बनवता येईल या दिशेने प्रयत्न सुरू केला.तब्बल अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि परिश्रमानंतर अशोक यांनी एक भन्नाट चार चाकी गाडी बनवली आहे. ही गाडी अगदी हुबेहूब १९३० सालच्या फोर्डगाडी प्रमाणे तयार केली आहे. विशेष म्हणजे भंगारातील वस्तू आणि दुचाकी व रिक्षाचे साहित्यातून ही गाडी साकारली आहे. या गाडीची इंजन हे एमएटी दुचाकीचे आहे.

गाडी सुरू करण्यासाठी रिक्षाप्रमाणे हँडल आहे आणि रिव्हर्स गिअरसाठी या गाडीला रिक्षाचा गिअर बॉक्स बसवला आहे. स्टेरिंग हा छोट्या ट्रॅक्टरचा आहे. तर चाके ही एमएटी दुचाकीची आहेत. तीन गिअर असणारी ही चार चाकी फोर्ड गाडी, प्रति लिटर ३० किलोमीटर इतके मायलेज देते.

चार व्यक्ती या गाडीमध्ये बसू शकतात. आता आवटी यांची ही भन्नाट १३० मॉडेलची अगदी फोर्डच्या खऱ्याखुऱ्या गाडीप्रमाणे दिसणारी हुबेहूब गाडी तयार झाली आहे. आता ती रस्त्यावर धावू लागली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष ही मिनी फोर्ड गाडी वेधून घेत आहे.

नुकताच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रेय लोहार यांच्या जिप्सीची दखल चक्क प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली होती. त्यामुळे ही गाडी देशभरात चर्चेत आली होती. असे असताना सांगलीतल्या एका अशोक आवटी यांनीही जबरदस्त चार चाकी गाडी बनवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post