खिदमते अवाम वेल्फेअर असोसिएशन व KGN एजुकेशन फाऊंडेशन यांच्या तर्फे ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 प्रजासत्ताक दिनानिमित्त अन्नदान दोनशे गरजूंना मिळाला लाभ


प्रेस मीडिया ऑनलाईन

पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख :


आज चिंचवड  स्टेशजवळच्या मस्जिदी समोर खिदमते अवाम वेल्फेअर असोसिएशन व KGN एजुकेशन  फाऊंडेशन यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, प्रथम महापुरुषांच्या  प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, व  भारतीय संविधान उद्देशिकाचा सामूहिक वाचन करण्यातआले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  पोलिस निरक्षक  माननीय धुमाळ साहेब व एडोकेट  कुंडलिक  जी गावडे यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आले.

खिदमते आवम वेल्फेअर असोसिएशनचे  यांच्या २६ जानेवारी २०२२ रोजी चिंचवड स्टेशनच्या  येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुस्लिम बांधव  व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांचे प्रतिष्ठित मौलवी (इस्लामी धर्म गुरू) मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

KGN फाउंडेशनचे अन्वर खान यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

खिदमते अवाम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल मोमीन यांनी प्रेस मीडिया लाईव्ह शी बोलताना सांगितलं की आज आज प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध भागांमध्ये गोर गरीब आणि गरजू लोकांना मदतिचा हात म्हणून अन्नदान करण्यात आले आहे. दोनशे लोकांनी अन्न वाटपचे लाभ धेतले,

खिदमते अवाम वेल्फेअर असोसिएशन ही एक सेवा भावी संस्था आहे.  ते कुठलाही भेदभाव न करता नेहमी  गरजू  गोरगरिबांच्या मदती साठी प्रयत्नशील असते. कोरोना काळात ही ते विविध शहराच्या भागांमध्ये समाजकार्यात अग्रसर होते.

आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून,मुफ्ती अब्दुस्समद साहेब, मुफ्ती फिरोझ साहेब, मुफ्ती अफरोज साहेब, मोलाना जैनुद्दिन साहेब,मदद फाऊंडेशन प्रमुख गौस सूनार, सामाजिक कार्यकर्ते इक्बाल मुल्ला साहेब आणि चांद बागी उपस्थिती होते.

 तसेच या कार्यक्रमासाठी व अन्न दान नियोजन राबवण्यासाठी खिदमत अवाम वेल्फेअर असोसिएशनचे सोहेल मोमीन, डॉ अशफाक बांगी, नईम पटेल, रिजवान शेख, हाफिज हुजैफा, जावेद झंडे, नाझीम नालबंद, साबीर सय्यद, नासीर पठाण ,यासीन इनामदार, हाफिज युसूफ नदाफ, जावेद इनामदार, शोएब सय्यद, शकूर मुल्ला आणि अन्वर शेख उपस्थित होते. 


जाहिरातीसाठी संपर्क  : प्रेस मीडिया लाईव्ह

Post a Comment

Previous Post Next Post