कर्नाटकात भाजपची सत्ता असून देखील 10 रूचे कॉइन घेत नाहीत.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी: आनंदा शिंदे :
आपल्या देशात भाजपची सात ते आठ वर्षे राज्य करीत आहे.या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी एका रात्रीत जुन्या नोटा बंद करु टाकल्या कारण काळा पैसा बाहेर येईल म्हणून परंतु काहीच हाती आले नाही.
पंतप्रधानानी नवीन चलना बरोबर नवीन नाणी देखील चलनात आणली.परंतु याचं देश मध्ये महाराष्ट्र लागून असलेल्या कर्नाटक मध्ये भाजपची सता असून ही तेथील नागरिक , व्यापारी १०/ रूपाची नाणी ( कॉइन) चलनात घेत नाहीत आमच्या कर्नाटकात घेते नाहीत असे सांगतात केवढी मोठी शोकांतिका व दुर्दैवी बाब आहे.
बँक पतसंस्था पेट्रोल पंप व्यापारी पेढ्या यांना १०/ - रुपये चा कॉइन न घेण्यारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो तर मग कर्नाटक सरकार आपल्या राज्या मध्ये हा आदेश का लागू करत नाही..? १०/- रूपये चा कॉइन चलनात न घेणाऱ्या बँक पतसंस्था पेट्रोल पंप व्यापारी पेढ्या वर कडक कारवाई झाली पाहिजे अशी नागरिकांच्या मध्ये चर्चा असून मागणी सुद्धा आहे.