ओमायक्रॉन'ने प्रशासनाची चिंता वाढविली असतानाच,

 सांगली महापालिका क्षेत्रात 86 लोक परदेशातून आल्याची धक्कादायक माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सांगली : ओमायक्रॉन'ने प्रशासनाची चिंता वाढविली असतानाच, गेल्या महिनाभरात सांगली महापालिका क्षेत्रात 86 लोक परदेशातून आल्याची धक्कादायक माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. यांत काही लोक दक्षिण आफ्रिकेतून आहे आहेत.महापालिकेने या लोकांचा शोध सुरू केला असून, त्यांची 'आरटीपीसीआर' चाचणी केली जाणार आहे.

'ओमायक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेने प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित केली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नव्या व्हेरियंटची माहिती ही नागरिकांना दिली जात आहे. परदेशातून आलेल्या लोकांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियातून महिनाभरात जवळपास 86 लोक शहरात आले आहेत. त्यांची यादी पोलीस प्रशासनाने महापालिकेला सुपूर्द केली आहे. याची छाननी करून कोणत्या देशातून किती लोक आले, याची माहिती संकलित केली जात आहे. दुसरीकडे, या लोकांचा शोध सुरू केला आहे. यांतील काहीजण अजूनही शहरात वास्तव्यास आहेत; तर काहीजण परत परदेशात गेल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.

कापडणीस म्हणाले, 'परदेशातून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. या सर्वच लोकांची 'आरटीपीसीआर' चाचणी होणार आहे. या चाचणीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास आणखी नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले जातील.'

Post a Comment

Previous Post Next Post