माजी आमदार मनोहर भोईर यांच्या शुभहस्ते पुनाडे साकव बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील चिरनेर विभागातील पुनाडे येथे जिर्ण झालेल्या साकवच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत निधी मंजूर करून आणला होता. सदरील कामाचे भूमिपूजन रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी सदरील काम सुरु झाल्यामुळे पुनाडे ग्रामस्थांनी माजी आमदार मनोहर भोईर यांचे आभार मानले.

यावेळी उपतालुका संघटक रुपेश पाटिल, जिवन गावंड मा.जि.प.सदस्य,  मा.पं.स.सदस्य लवेश म्हात्रे, शाखाप्रमुख प्रशांत म्हात्रे, जगदिश पाटिल मा.सरपंच, भिमराव ठाकुर, ग्रा.पं.सदस्य चंद्रकांत पाटील, घनश्याम पाटील, राजेश पाटील, विशाल गावंड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post