शिवकर गावातील आमरण उपोषणास आदिवासी संघर्ष समितीची हजेरी...



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिना पासून  शिवकर गावचे सरपंच अनिल ढवळे व समाजसेवक नरेश भगत, सखाराम पाटील हे अमरण उपोषणास बसले असून गावठाण विस्तार योजना राबविण्यात यावी, ग्रामस्थ शेतकऱ्यांनी वनविभाग ,शेतघर  गुरुचरण या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष पूर्वी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यात यावीत अशा विविध मागण्यासाठी उपोषण सुरू आहे. तात्काळ गावठाण विस्तार योजनेस सुरुवात करावी, सीडको प्रकल्प रद्द करावीत , नैना प्रकल्प रद्द  करावा, वनखाते व गुरुचरण, महाराष्ट्र शासन जमिनी शेतघरे यांची बांधकामे नियमित करावीत ,कमी केलेला रेडीरेकनर  दर हा पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावा, ग्रामपंचायतीला बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार काढलेले असून ते नियमित करण्यात यावे  या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना "आदिवासी संघर्ष समिती" रायगड व एससी ,एसटी ,ओबीसी , असंघटित कामगार संघ ठाणे - नवी मुंबई या  संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे .सदर संघटनेचे अध्यक्ष विलास घरत यांनी सांगितले की, सिडको, नैना,आपण संघटित नाही म्हणून आपल्यावर अन्याय करीत आहे. आपली जमीन असून आपल्याला पैसे भरावे लागतात .सिडकोला आपण पैसे देतो आपण सिडकोला पैसे का  भरावे ?  ते पुढे म्हणाले की , दि.बा. पाटील यांनी  आपल्याला साडेबारा टक्के मिळवून दिले पण 1984 पासून  आमचे अजून पर्यंत प्लॉट मिळाले नाहीत 2013 मध्ये या   परिसरात साडेचार हजार  झाडे होती .ती कुठे गेली ती तोडली गेली आहेत. आम्ही आपल्या आंदोलनाच्या पाटी ठाम उभे असल्याचे त्यांनी सांगितले. या उपोषणास पत्रकार सुधाकर लाड, पत्रकार दीपक कावळे कॉम्रेड अण्णा ,एम .सी .गवई, हरिचंद्र वाघमारे ,दत्ता धोंडगे ,( लाडीवली गाव)  यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post