डॉ. विक्रम शिंगाडे यांना सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप, पुणे विद्यापीठ कडुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 डॉ. विक्रम शिंगाडे यांना  सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप, पुणे विद्यापीठ कडुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                        

 डॉ. विक्रम शिंगाडे हे कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेडकिहाळ संस्थापक अध्यक्ष व पत्रकार तसेच मानव अधिकार हक्क सल्लागार, सिमाभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत.  डॉ.विक्रम शिंगाडे यांना   सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप, पुणे विद्यापीठ यांच्या कडुन यांना एक्समंप्लेरी सोशल ऍन्ड प्रोफेशनल कॉन्ट्रीभुषण ऍवॉर्ड सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप पुणे विद्यापीठ चे संस्थापक अध्यक्ष, चेअरमन डॉ संजय चोरडीया, व सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप पुणे विद्यापीठ चे व्हाईस चेअरमन सौ. सुषमा चोरडिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.                       

 डॉ. विक्रम शिंगाडे यांचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेन्यासारखे आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये सर्व सामान्यांचा एक रखवालदार म्हणून कार्य करीत असतात.तसेच गरीब गरजू लोकांना नेहमी मदत करत असतात. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अनेक गरजु लोकांना अन्नधान्य, कपडे, औषधे यांची व्यवस्था करुन दिली. तसेच गरजु लोकांसाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात, अनेक गरजू विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, तसेच त्यांच्या शालेय फी आपल्या स्वखर्चाने करून देत असतात. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करत असतात, गरजू महिलांसाठी साडी वाटप करणे, राशन वाटप करणे, तसेच रक्तदान शिबीर आयोजित करणे, असे अनेक उपक्रम ते नेहमी राबवत असतात. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप पुणे विद्यापीठ यांनी पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. तसेच  नुकतेच त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन इंडियन इंपायर डवलपमेंट, चेन्नई युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट  पदवी बहाल केली आहे. तसेच शिंगाडे यांना अनेक समाजभूषण, समाज रत्न, समाज गौरव, उधोगरत्न, युवा नेते, युवा गौरव असे अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांना थोर विचारवंत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ  अशा अनेक थोर विचारवंतांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना सुर्यद्त्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप पुणे विद्यापीठ कडुन पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर अनेक राज्यातुन तसेच संघ संघटना, युवा फेडरेशन, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांच्याकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन ग्रुप पुणे विद्यापीठ हे पुणे मधील नामांकित कॉलेज असुन पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. या विद्यापिठाचा सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार आण्णा हजारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते अक्षय कुमार, अभिनेते सोनु सुद, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अशा अनेक थोर विचारवंताना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. शिंगाडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा  पुरस्कार दि- 4 रोजी पुणे विद्यापीठ येथे देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post