भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या मोठा संघर्ष ..

 जिओ आणि एअरटेलकडे  अनेक ग्राहक आकर्षित ;वोडाफोन-आयडिया नव्याच संकटात 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

नवी दिल्ली | भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये  सध्या मोठा संघर्ष पहायला मिळत आहे. जिओनं  जेव्हापासून या क्षेत्रात प्रवेश केला आहे, तेव्हापासून इतर मोठ मोठ्या कंपन्यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला आहे.त्यात सर्वात वाईट हाल वोडाफोन-आयडियाचे  झालेले पहायला मिळत आहे. दोन कंपन्या एकत्र आल्यानंतरही त्यांच्या अ़डचणी कमी होण्याची चिन्हं नाहीत. आता ते नव्याच संकटात सापडले आहे.

सध्या टेलिकॉम मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेलकडे  अनेक ग्राहक आकर्षित होताना दिसत आहेत. याचा मोठा फटका वोडाफोन आयडियाला बसताना पहायला मिळत आहे. त्यांचे अनेक युझर्स आपले नंबर पोर्ट  करत असून या पासून बचाव करण्यासाठी वोडाफोन-आयडियाने मोठी खेळी खेळल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप खुद्द मुकेश अंबानी यांची कंपनी जिओनं केला आहे.

जिओनं वोडाफोन आयडियाविरोधात ट्रायकडे धाव घेतली आहे. एन्ट्री लेव्हल ग्राहकांच्या प्लॅनमध्ये मोफत आऊटगोईंग मेसेजचा  पर्याय वोडाफोन आयडिया देत नाही, त्यामुळे एखाद्या ग्राहकाला आपला नंबर पोर्ट करायचा असेल तर अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्याला त्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत, असा जिओचा दावा आहे.

वोडाफोन आयडियाचा महाग पॅक खरेदी केला तर त्या मध्येच फक्त मोफत मेसेजिंग देण्यात येत आहे. त्यामुळे एन्ट्री लेव्हल ग्राहकांना म्हणजेच कमी दराचे पॅक घेणाऱ्या ग्राहकांना नंबर पोर्ट करताना जे मेसेज पाठवावे लागतात त्यासाठी पैसे मोजावे लागतील, या कारणामुळे ग्राहक मोबाईल नंबर पोर्ट करण्याबाबत उदासीन होतील, असं जिओचं म्हणणं आहे. आता ट्राय याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Jio Plans)

Post a Comment

Previous Post Next Post