रवी पटवर्धन अभिनेते यांनी ब्लॅक अँड व्हाइट’ चित्रपटाच्या जमान्यात त्यांनी अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.

 रवी पटवर्धन अभिनेते

६ सप्टेंबर १९३७ --- ०६ डिसेंबर २०२०

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रवी पटवर्धन यांनी आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करून अभिनय श्रेत्रात पाऊल ठेवले. ‘ब्लॅक अँड व्हाइट’ चित्रपटाच्या जमान्यात त्यांनी अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्या काळी “आमची माती आमची माणसं” हा शेतकऱ्यांसाठी असलेला गप्पागोष्टीचा कार्यक्रम त्यांच्या “वस्ताद पाटील” भूमिकेमुळे चांगलाच गाजला होता. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ‘उंबरठा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘शेजारी शेजारी’, ‘अशा असाव्या सुना’, ‘तक्षक’, ‘तेजाब’, ‘नरसिंहा’, ‘प्रतिघात’, ‘राजू बन गया जेंटलमेन’, ‘चमत्कार’, ‘युगपुरुष’ असे अनेक हिंदी-मराठी चित्रपट त्यांनी साकारले. वयाच्या ८०व्या वर्षी भगवतगीतेचे ७०० श्लोक पाठ करून त्यांनी शृंगेरी मठाच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका.


- मंदार जोशी

Post a Comment

Previous Post Next Post